Home » राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात अकोल्याच्या तीन बॉक्सरची निवड

राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात अकोल्याच्या तीन बॉक्सरची निवड

by Navswaraj
0 comment

अकोला : गोवा येथे आयोजित ३७ व्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र बॉक्सिंग संघात अकोल्याच्या तीन बॉक्सरची निवड झाली आहे. अकोला क्रीडा प्रबोधिनीचे राष्ट्रीय पदक विजेती बॉक्सर विधी राकेश रावल हिची ७५ किलो वाजन गटात निवड झाली आहे. याशिवाय ८० किलो वजन गटात शितीज अशोक तिवारी याची निवड झाली आहे.

तिवारी सोबतच ७१ किलो वजन गटात मोहम्मद राहिल रफिक सिद्दीकी याचीही निवड झाली. राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर या तिन्ही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धा १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान गोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. या तिन्ही बॉक्सरला प्रशिक्षक सतिशचंद्र भट्ट यांचे मार्दर्शन लाभले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!