Home » शालेय वह्या, पुस्तकांचे भाव कडाडले : ४० टक्के महाग

शालेय वह्या, पुस्तकांचे भाव कडाडले : ४० टक्के महाग

by Navswaraj
0 comment

अकोला : कागद महागल्यामुळे, शालेय वह्या, स्टेट तसेच सीबीएसई पुस्तकांच्या किंमतीत ४० टक्के वाढ झाली आहे. विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या जास्त असल्यामुळे अशा शाळात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पुस्तकांचा लाभ मिळत नाही. त्यांना दरवर्षी बाहेरून पुस्तके विकत घ्यावी लागतात. वर्ग ९ – १०ची पुस्तके जास्त महाग आहेत.

प्रत्येक शाळा व्यवस्थापनाचे वह्या, पुस्तके तसेच गणवेशाची ठरलेली दुकाने आहेत. पुस्तके व गणवेश अन्यत्र मिळत नसल्यामुळे पालकांना शालेय व्यवस्थापनाने कळविलेल्या दुकानातून खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. तेथे अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, गणवेशाचे कापड देखील सामान्य प्रतिचे असते. शाळांची देणगी, वार्षिक शुल्क, वर्षभर चालणारे अभ्यासेत्तर उपक्रम, प्रकल्प कामांच्या खर्चाची तोंडमिळवणी करताकरता पालक मेटाकुटीस येतात. भरीस भर म्हणजे दरवर्षी वाढणारे शुल्क, गणवेशात बदल, कंबरडे मोडणारे आहे. आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून पालकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, असे एका पालकांनी नवस्वराजला सांगितले. शिक्षण विभागाने यात हस्तक्षेप करावा, अशी पालकांची मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!