Home » राज्यात स्वातंत्र्यवीरांचा जन्मोत्सव होणार साजरा

राज्यात स्वातंत्र्यवीरांचा जन्मोत्सव होणार साजरा

by Navswaraj
0 comment

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन सावरकर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विट करीत घोषणा केली. त्यामुळे २८ मे हा दिवस सावरकर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा घराघरा पोहोचविण्यात आले. आता सावरकरांचा सन्मान वाढविण्यासाठी आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २८ मे हा दिवस आता सावरकर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. त्यानूसार शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

error: Content is protected !!