Home » श्रींच्या पालखीचा अकोल्यात मुक्काम

श्रींच्या पालखीचा अकोल्यात मुक्काम

by Navswaraj
0 comment

अकोला : संत नगरी शेगाव येथुन पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पायी वारीने रविवारी, २८ मे २०२३ रोजी अकोला नगर परिक्रमा केली. जुने शहरातील खंडेलवाल शाळेतून पालखीच्या नगर परिक्रमेला प्रारंभ झाला.

डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, वीर हनुमान चौक, काळा मारुती मंदिर, लोखंडी पूल, सिटी कोतवालीमार्गे शहरातून भ्रमण करीत पालखीने श्री राजराजेश्वर नगरी अकोला येथे मुक्काम केला. भौरदमार्गे अकोल्यात आगमन झाल्यानंतर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी मंजुषा सावरकर, अनुप धोत्रे, जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, माधव मानकर, शंकर वाकोडे, राजेश बेले नीलेश निनोरे, विलास शेळके आदी उपस्थित होते.

डाबकी मार्गावर माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. अशोक ओळंबे यांनी पालखीचे स्वागत केले. विठ्ठल मंदिर परिसरात रमेश अलकरी, दत्तात्रय जोशी गुरूजी, कैवल्य अलकरी, उमाळे बंधु व विठ्ठल मंदिर अखंड हरीनाम सप्ताहाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. श्री वीर हनुमान चौकातही पालखीचे पूजन व स्वागत करण्यात आले. नरेंद्र कराळे, हेमंत जकाते, माजी नगरसेविका मंजुषा शेळके, संतोष बर्डे, मनोज मोकाशे, नितीन विसपुते, प्रदीप परचुरे, सचिन देशमुख, विनोद बर्डे, विनोद पाचकवडे, अभिजित कराळे, विशाल यादव, देवाशिष बर्डे, अर्जुन किर्तीवार, हेमल खिलोसिया, देवेश विसपुते, देवाशिष रत्नाकर, अभिजित पाचकवडे, ऋषीकेश जकाते, रुपेश ढोरे, शुभम ढोरे, रोहित सातव यांनी पालखीचे स्वागत व पूजन केले.

‘गण गण गणात बोते’च्या गजरात टाळ-मृदुंगधारी वारकऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले. अश्व, पताका, वारकऱ्यांनी अकोलेकरांचे लक्ष वेधुन घेतले. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी फळवाटप, शितपेय, कुल्फी, पाण्याच्या बॉटल्स, फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. अकोल्यात पोहोचल्यानंतर पालखीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात राहणार आहे. २९ मे रोजी सकाळी पालखी जय हिंद चौक, हरीहरपेठ मधे मुक्कामी असेल. २७ जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

जुने शहरातील वीर हनुमान चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. (छायाचित्र : अभिजित कराळे)

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!