Home » कर्फ्यूमुळे रद्द झालेला पेपर ३१ मे रोजी

कर्फ्यूमुळे रद्द झालेला पेपर ३१ मे रोजी

by Navswaraj
0 comment

अमरावती : अकोला येथे दोन समुदायात दंगल उसळल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने १५ मे रोजी असलेली परीक्षा पुढे ढकलली होती. या परीक्षेचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ मे २०२३ रोजी रद्द करण्यात आलेली परीक्षा आता ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. उन्हाळी बी.एड सेमिस्टर दोन (नवीन पॅटर्न), बी. टेक सेमिस्टर चार (सीबीसीएस) या परीक्षांचाही त्यात समावेश आहे. अकोला शहरातील २०१, २०५,२०६, २०७,२१०,२१२, २१४, २२१, २२५,२२९, २३१ या क्रमांकाच्या परीक्षा केंद्रांवरील पेपर १५ मे रोजी रद्द करण्यात आले होते.

अकोल्यातील दिवसाची संचारबंदी आता शिथिल झाली आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने सुरळीत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मे रोजी रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित केले आहे. याशिवाय हिवाळी परीक्षांच्या तारखांमध्ये बदलाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

हिवाळी २०२२ परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्याचे तोटे-पाटील यांनी स्पष्ट केले. बीई सेमिस्टर एक व दोनची (सीबीसीएस) परीक्षा २२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. बीई सेमिस्टर एक व दोनची (सीबीसीएस) परीक्षा २६ मे रोती सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वेबसाईटवर असलेले परीक्षा वेळापत्रक अंतिम समजावे, असे तोटे-पाटील यांनी सांगितले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!