Home » लेके प्रभूका नाम’गाणे चित्रपटातून काढण्याची सनातन संस्कृती महासंघाची मागणी 

लेके प्रभूका नाम’गाणे चित्रपटातून काढण्याची सनातन संस्कृती महासंघाची मागणी 

by नवस्वराज
0 comment

अकोला : सनातन संस्कृती महासंघाचेवतीने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

१२ नोव्हेंबर २०२३ रोजी यशराज बॅनर्सचा मनीष शर्मा यांच्याद्वारा निर्देशित टायगर-३ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनाचे एक साधन आहे. परंतु चित्रपट सृष्टी ( बॉलीवूड) या उद्दिष्टापासून भरकटल्याचे दिसून येते.

टायगर-३ या चित्रपटातील गाणे ‘लेके प्रभू का नाम’ हे सिनेकलावंत सलमान खान, कतरिना कैफ व अन्य कलाकारांवर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात कतरिना कैफ आणि अन्य महिला कलाकारांना अत्यंत तोकड्या कपड्यात दाखविण्यात आले आहेत. चित्रपटात हिरोचे नाव ‘प्रभू’ नाही. त्यामुळे त्याला उद्देशून हे गाणे म्हटलेले नाही.

सनातन धर्मीय देवांचा उल्लेख आदराने ‘प्रभू’ असा करतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे तोकड्या कपड्यातील महिला सिनेकलाकारांच्या तोंडी ‘प्रभू’ हे नाव घालून सनातन धर्मीयांच्या देवांचा अपमान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे सनातन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, टायगर-३ चित्रपटातील ‘लेके प्रभू का नाम’ हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अथवा गाण्यातील ‘प्रभू’ हा शब्द ताबडतोब वगळण्यात यावा. भविष्यात चित्रपटांना प्रमाणपत्र देतांना सनातन धर्म तसेच सनातन संस्कृतीचा अनादर होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी असे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!