Home » Akola Sanatan Sanskrti Manasangh : पाकिस्तानात हिंदू, शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नसल्याचा निषेध

Akola Sanatan Sanskrti Manasangh : पाकिस्तानात हिंदू, शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नसल्याचा निषेध

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : पाकिस्तानात हिंदू, शीख, ख्रिश्चन तसेच अहमदिया मुस्लिमांसाठी कायदे अत्यंत जाचक आहेत. अल्पसंख्याकांना पाकिस्तानात धार्मिक स्वातंत्र्य नाही.  तसेच निदर्शने करणाऱ्यांना ईशनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा देखील दिली जाते. याप्रकाराचा निषेध व्यक्त करीत सनातन संस्कृती महासंघाने यासंदर्भात जिनिव्हाच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवले आहे. (Sanatan Sanskriti Mahasangh Appeal to International Human Rights Commission to Interfere In Matter of Religious Persecution in Pakistan)

पाकिस्तानात हिंदू, शीख, ख्रिश्चन व अहमदिया मुस्लिम हे अल्पसंख्यक आहेत. त्यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या धार्मिकस्थळांवर तसेच रहिवासी वस्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत. यात निरपराध लोक बळी पडतात. अल्पसंख्यकांचे बळजबरीने करण्यात येत असलेले धर्मांतरण हा देखील गंभीर मुद्दा आहे. ‘अमेरिकन कमिशन ऑफ इंटरनॅशनल रिलिजियस फ्रिडम’च्या अहवालात तसे नमूद केले आहे. पाकिस्तानात अल्पसंख्यकांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.

सनातन संस्कृती महासंघातर्फे जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानातील जाचक कायद्यांमुळे अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकारांचे होत असलेले उल्लंघनाचा तसेच बळजबरीने करण्यात येत असलेल्या धर्मांतरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आयोगाने हे प्रकार थांबवित अल्पसंख्यकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे व मानवाधिकाराचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत भारतातील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला देखील पाठविण्यात आली असल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!