Home » समृद्धीवर अपघात : सिंदखेडराजाजवळ तीन ठार, दोन जखमी

समृद्धीवर अपघात : सिंदखेडराजाजवळ तीन ठार, दोन जखमी

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कारला मागून दूसऱ्या कारने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. शिवना पिसा या गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात ३ जण ठार तर २ जण जखमी झालेत.

अपघातातील जखमींवर मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर तात्काळ बचाव पथकाने अपघातग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून बाजूला हटविली. लोकार्पण झाल्यापासून समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अडीचशेवर अपघात घडले आहेत. १२ डिसेंबरला मेहकरजवळ मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन उलटला होता. १५ डिसेंबरला चालकाला झोप लागल्याने कार कठड्याला धडकून बाळांसह तिघे गंभीर जखमी झाले होते. १६ डिसेंबरला मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एक किरकोळ जखमी झाला. याच दिवशी मेहकरजवळ कार कठड्याला धडकल्याने चालक जखमी झाला होता. २८ डिसेंबर रोजी कारंजाजवळ भीषण अपघात झाला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!