Home » सामाजिक समरसता मंचातर्फे कर्तृत्ववानांचा सत्कार

सामाजिक समरसता मंचातर्फे कर्तृत्ववानांचा सत्कार

by नवस्वराज
0 comment

अकोला : महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी अग्रसेन भवन येथे सामाजिक समरसता मंचातर्फे १०० सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. श्री तुकाराम महाराजांचे ११वे वंशज श्री क्षेत्र हेदू येथील शिरीश महाराज मोरे, साप्ताहिक विवेकचे कार्यकारी संपादक रवींद्र गोळे, आमदार अशोक उइके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सामाजिक कार्यकर्त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महानगर संचालक गोपाल खंडेलवाल, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे उपस्थित होते. सामाजिक समरसता मंचाचे सारंग करे, अरविंद बानाईत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!