Home » संत संगोष्ठी, सद्भाव बैठक संपन्न

संत संगोष्ठी, सद्भाव बैठक संपन्न

संतांनी समाज जोडून ठेवला आहे डाॅ सुभाष लोहे,

by Navswaraj
0 comment

अकोला : शनिवार २२ जुलै रोजी स्थानिक खंडेलवाल भवन येथे सद्भावना विभागातर्फे सद्भाव बैठक, संत संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. मंचावर हभप संजय महाराज पाचपोर, विचार मंचाचे संयोजक डॉ सुभाष लोहे, प्रांत सह संयोजक अतुल घरोटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय महाराज पाचपोर यांनी भूषविले. भारतमाता व विठ्ठलाचे प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

बिजभाषणात डॉ. सुभाष लोहे यांनी हिंदू समाज हा परमेश्वर भक्तीत लिन होणारा समाज असून, अतिशय सहिष्णू असल्याचे सांगितले. हिंदू समाज समस्त विश्वाला आपलं कुटुंब मानतो. मुगलांनी आक्रमण करून आपल्या मंदिराना लक्ष करून मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले. प्रत्येक संत हा समाजाचा संत आहे. परमेश्वर भक्तीच्या माध्यमातून आपल्याला सक्षम समाज उभा करायचा आहे, आपल्या संतांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला जोडून ठेवले आहे. देश गुलामगिरीत असतांना समाजात चेतना निर्माण करण्याचे काम स्वामी विवेकानंदानी केल्याचे ते आपल्या उद्बोधनात बोलले.

भारतीय संस्कृतीवर होणारे आघात वाचवण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे विचार ह भ प महल्ले महाराज यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात संजय महाराज पाचपोर यांनी लव जिहाद, गोरक्षा, धर्मातरण या ज्वलंत विषयांवर विस्ताराने उहापोह केला. समाजातील कुटुता, भेदभाव बाजूला ठेवून एकत्रितपणे संस्कृतीचे रक्षण आणि राष्ट्र निर्माणाचे कार्य करायचे असल्याचे ते म्हणाले. बैठकीला संत तसेच कार्यकर्ता उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!