Home » वज्रमूठमुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरलीय : संजय राऊत

वज्रमूठमुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरलीय : संजय राऊत

by नवस्वराज
0 comment

नागपूर : वज्रमूठ सभा कोणत्याही एका पक्षाची नाही. महाविकास आघाडीची ही सभा आहे. सर्वच विरोधी पक्ष एकत्र आल्याने भारतीय जनता पार्टीला धडकी भरलीय असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी तथा खासदार संजय राऊत यांनी केले.

वज्रमूठ सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार राऊत शनिवार, १५ मार्च २०२३ रोजी नागपुरात पोहोचले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी खासदार राऊत यांनी भेट दिली. यावेळी देशमुख यांनी खासदार राऊत यांचा सत्कार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, भारतीय जनता पार्टी पुरती घाबरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द करणे, अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस पाठविणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.

खासदार राऊत यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोंडभरून स्तुती केली. नागपूर बदलत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. संजय राऊत म्हणाले, नागपूर बदलत आहे. बदल स्पष्ट दिसतोय. याचे बरेचसे श्रेय नितिन गडकरी यांना द्यावे लागेल. २०२४ला नागपूरचे चित्रं पूर्ण बदललेले दिसेल. त्या बदलाचे श्रेय जनतेला द्यावे लागेल. सुडाचे इमले उध्वस्त होतील. आघाडीची सभा होऊ नये म्हणून भाजप आमदार मोर्चे काढतात. नागपूर इतके दुष्ट कधीच नव्हते, असेही खासदार राऊत म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!