Home » ‘समृद्धी’वर प्रवेशासाठी होतेय वाहनांची कडक तपासणी

‘समृद्धी’वर प्रवेशासाठी होतेय वाहनांची कडक तपासणी

by नवस्वराज
0 comment

नागपूर/अकोला : लोकार्पण झाल्यापासून हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी राष्ट्रीय महामार्ग अपघाताचा सापळा बनला आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी आता कडक उपाययोजना करण्यात आली आहे. नागपूर ते शिर्डीदरम्यान या महामार्गावर कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात प्रवास करणाऱ्यांचे वाहन ‘फिट’ नसल्यास महामार्गावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

राज्याची भाग्यरेखा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये समृद्ध महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यातील बहुतांश अपघात हे टायर फुटल्यामुळे किंवा टायरशी संबंधित समस्यांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. आता असे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनाचे टायर्स योग्य स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळणार नाही. आरटीओकडून ‘नो एन्ट्रीची कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनाचे टायर सुस्थितीमध्ये नसताना महामार्गावरून प्रवास करताना आढळल्यास आता आरटीओ दंडात्मक कारवाईही करणार आहे. आतापर्यंत आरटीओने समृद्धी महामार्गावरून मोठ्या दंडाची वसुली केली आहे. त्यामुळे ‘अनफिट’ वाहन चालविण्यासाठी आता चालकांना टोल अधिक दंड असा महागडा प्रवास करावा लागणार आहे. त्यानंतरही पोलिस वाहन समृद्धी महामार्गावरून जाऊ देणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!