Home » आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार

आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार

by Navswaraj
0 comment

अकोला : वाहन नोंदणी नूतनीकरण, वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण आदींची मुदत टळुन गेल्यास वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय दंडात्मक कारवाई करते. नवीन वाहन नोंदणी, वाहन चालवण्यासाठीचा तात्पुरता, स्थाई परवाना मिळवण्यासाठी कार्यालयात खेटे घालावे लागतात. कार्यालयीन प्रक्रिया ऑनलाईन झाली असली तरी दलालांचे माध्यमातून गेले तरच उशिराने का होईना पण काम होते.

वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी स्मार्टकार्ड देण्यात येतात पूर्वी कागदाचा वापर करण्यात येते होता. परंतु स्मार्टकार्ड उपलब्ध नसल्यामुळे सात, आठ महिने झाले, तरी कार्ड देण्यात येत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. कार्ड पद्धती २००६ पासून सुरू झाली. प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयात कार्डाची छपाई होत होती. परंतु आता मुंबई, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील कार्यालयातच कार्ड छापले जातील, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे आणखी विलंब होत आहे. भविष्यात कार्ड स्वरूपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालवण्याच्या परवान्यात दुरुस्ती करावयाची असल्यास, वाहन व परवाना धारकांना कार्डंची छपाई झालेल्या शहरात जाऊन करावे लागेल, ज्यामुळे त्रास वाढेल. स्मार्टकार्ड पुरवण्याची व त्यातील आवश्यक नोंदींच्या दुरुस्तीची पद्धत शासनाने सुलभ आणि सोईची करावी अशी वाहनधारकांची मागणी आहे.

error: Content is protected !!