Home » आरएसएस, भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करणार : योगेंद्र यादव

आरएसएस, भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करणार : योगेंद्र यादव

by Navswaraj
0 comment

 

वर्धा : आगामी २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आपण लढणार नाही. कार्यकर्ता म्हणून देशातील दीडशे संघटना ‘भारत जोडो’त एकत्र आल्या आहेत. देशाला व संविधानाला वाचविण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे यात्रेचे राष्ट्रीय संयोजक प्रा. योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विरोधात असलेल्या या मोहिमेची मुहूर्तमेढ गांधी जयंतीला वर्धेतून रोवल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. गांधी हत्या करणाऱ्या विचारांचा आज सर्वत्र प्रचार, प्रसार केला जात आहे. त्यामुळे अशा शक्तींना रोखण्यासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त साधणे गरजेचे होते. ‘भारत जोडो’ यात्रेतून लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वासही प्रा. योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने नुकतेच पारीत केलेले नारीशक्ती वंदन विधेयक म्हणजे महिलांची थट्टाच असल्याची टीका भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक प्रा. योगेंद्र यादव यांनी केलीय. सरकारने हा कायदा पारीत करताना यात अनेक त्रुट्या ठेवल्या आहेत. त्यातील तीन त्रुट्या मुख्य आहेत. त्यामुळे महिलांना केंद्र सरकारने खरच न्याय दिलाय काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वर्धात येथे त्यांनी या विषयावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना या कायद्यामुळे ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्राने मंजूर केलेल्या या कायद्यामुळे मोदींचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु या कायद्यात तीन महत्वाच्या त्रुटी असल्याचे प्रा. यादव यांनी स्पष्टपणे नमूद केले. या विधेयकाचा अभ्यास केल्यानंतर महिलांना १५ वर्षांसाठी आरक्षण मिळेल असे सांगण्यात येत आहे. २०२९ मध्ये हे आरक्षण लागू करण्यात येणार आहे, असे मोदी सरकार सांगत आहे. २०२३ मध्ये देशातील जनगणनेची आकडेवारी जाहीर होईल. डी-लिमिटेशनची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठीच बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण २०३८ पर्यंत हे आरक्षण लागू होईल की नाही, याबद्दल शंका असल्याचे प्रा. यादव म्हणाले. आरक्षण कुणाला मिळेल, ओबीसींचे काय होणार, रोटेशन कसे असेल, आरक्षणाची पद्धत काय असेल याबाबत सरकार मौन असल्याचेही प्रा. यादव यांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!