Home » बुलढाण्यात अद्रक पिकावर मुळकुजचा प्रादुर्भाव

बुलढाण्यात अद्रक पिकावर मुळकुजचा प्रादुर्भाव

by Navswaraj
0 comment

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील अद्रक उत्पादक शेतकरी विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडला आहे. येलो मोझॅकने सोयाबीन पीक हातचे गेल्यानंतर आता अद्रकावर रोग आला आहे.

सर्वच तालुक्यात सोयाबीन पिकाला यलो मोझॅक, मूळकुज, खोडकुजीचा मोठा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनवर तर ‘यलो मोझॅक’ हा विषाणूजन्य रोग आणि ‘खोडकुज’, ‘मुळकुज’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट येत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचवेळी लागवड, कीटकनाशके फवारणी आणि निंदनासाठी शेतकर्‍यांनी जवळपास एकरी १ लाख रुपयांचा खर्च केला आहे. अशात अद्रक पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!