Home » चंद्रपुरातील एक घर, चार खोल्या महाराष्ट्रात तर किचन तेलंगणात

चंद्रपुरातील एक घर, चार खोल्या महाराष्ट्रात तर किचन तेलंगणात

by नवस्वराज
0 comment

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातले एक घर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये विभागले गेले आहे. एकाच घरातील चार खोल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर चार तेलंगणा राज्यात गेल्या आहेत.

महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमाभागात महाराजगुडा गाव आहे. त्या गावातील एक घर महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये विभागले गेले आहे. घराचे मालक उत्तम पवार सांगतात की आमच्या घरातील १२-१३ जण इथे राहतात. माझ्या भावाच्या ४ खोल्या तेलंगणात आणि ४ माझ्या महाराष्ट्रात आहे. स्वयंपाकघर तेलंगणा राज्यात गेले आहे. 1969 मध्ये जेव्हा हद्दीचा सर्व्हे करण्यात आला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आमचे अर्धे घर महाराष्ट्रात आहे आणि अर्धे तेलंगणात आहे. त्यामुळे पवार यांना महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही ग्रामपंचायतीचा कर भरावा लागतो. चार खोल्यांचा कर महाराष्ट्रात जातो तर बाकीच्या चारचा तेलंगणात.

पवार यांच्या घरात काही घटना घडली तर त्यांना आधीच्या चार खोल्यांसाठी महाराष्ट्र पोलिसांकडे जावे लागेल. तर किचनसह उर्वरित चार खोल्यांसाठी तेलंगणा पोलिसांकडे. आम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही, असे पवार यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!