Home » Nagpur News : रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा अमोल मिटकरींनी घेतला समाचार

Nagpur News : रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा अमोल मिटकरींनी घेतला समाचार

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : आमदार रोहित पवार सध्या त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे चर्चेत आहेत. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक प्रकरण गाजत आहे. त्यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले की, प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप असूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. मात्र नवाब मलिकांवर कारवाई केली जाते. प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचा मेळ बसविल्यामुळे त्यांना सूट देण्यात येत आहे का, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला. (Rohit Pawar Said Action Has Been Taken On Navab Malik But No Action On Prafulla Patel Inspite Of Serious Charges Against Him MLA Amol Mitkari From Akola Replied)

विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांचे वक्तव्य आणि संघर्ष यात्रेचा खरपूस समाचार घेतला. विधिमंडळाबाहेर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मिटकरी म्हणाले, रोहित पवारांना अजित पवारांनी दिलेला निधी चालतो. मात्र ते भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले चालत नाही. रोहित पवारांना कुठलाही कामधंदा राहिलेला नाही. ते बालमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संघर्ष यात्रेबद्दल बोलताना मिटकरी म्हणाले की, आयुष्यात कुठलाही संघर्ष न केलेल्या व्यक्तीने संघर्ष यात्रा काढणे हास्यास्पद आहे. बालमित्रांसोबत काढलेली ही यात्रा केवळ प्रसिद्धीसाठी आहे. या यात्रेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समर्थन नाही, जर असते तर राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते त्यामुळे यात्रेला कवडीचीही किंमत नसल्याची टीका अमोल मिटकरींनी केली आहे.

error: Content is protected !!