Home » रोहन बुंदेले यांना राज्यस्तरीय युवा आयकॉन पुरस्कार प्रदान

रोहन बुंदेले यांना राज्यस्तरीय युवा आयकॉन पुरस्कार प्रदान

by Navswaraj
0 comment

अकोला : विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेच्यावतीने राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनात सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या युवकांना युवा आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले यांना सन्मानित करण्यात आले.

अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, आमदार डॉ. रणजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, अकोट न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बावीस्कर, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय समितीचे सदस्य डॉ. गजानन नारे, युवा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या हस्ते बुंदेले यांना युवा आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुंदेले यांनी सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाचा दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार व अनेक सामाजिक संघटना, संस्थेच्यावतीने पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!