Home » रोहन बुंदेले यांना अमरावती विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार

रोहन बुंदेले यांना अमरावती विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार

by Navswaraj
0 comment

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी रोहन बुंदेले याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार युवा महोत्सवात प्रदान करण्यात आला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात चार लाख विद्यार्थी संख्या मधुन विद्यापीठाचा सर्वात मोठा आणि प्रथम पुरस्कार रोहन बुंदेले याला प्रदान करण्यात आला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत प्रा. राम मेघे महाविद्यालय येथे आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, उद्घाटक युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ नितीन धांडे, प्रमुख पाहुणे गजल गायक भीमराव पांचाळे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्या हस्ते रोहन बुंदेले याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाच्यावतीने संगीत विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, डॉ. वनिता भोपत, प्रा. नेत्रा मानकर, सिनेट सदस्य डॉ अविनाश बोर्ड, डॉ. प्राजक्ता पोहरे व्यासपीठावर उपस्थित होते. या आधीही बुंदेले याला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार व अनेक सामाजिक संघटना, संस्थेच्यावतीने अनेक पुरस्कार मिळाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!