Home » अकोल्यात तब्बल ४४ वर्षानंतर झाले रियुनीयन

अकोल्यात तब्बल ४४ वर्षानंतर झाले रियुनीयन

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोला शहरातील गोडबोले प्लॉट स्थित भीकमचंद खंडेलवाल विद्यालयामधील १९७९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक शैलेश देशमुख यांचा सत्कार सोहळा त्यांच्या राहत्या घरी नादब्रह्म केशवनगर, अकोला येथे आयोजित केला.

कार्यक्रमाचे आयोजन अरविंद पाटील, श्याम जाजू, किशोर अंबरखाने, गजानन कुलकर्णी, सुधीर कुऱ्हेकर, रवी अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला ३० माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी मुंबई, मुक्ताई नगर, अकोट अमरावती येथून आले होते. अनेक जण मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांनी आपला अमुल्यवेळ या कार्यक्रमासाठी दिला.  विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले. शैलेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी अंजली देशमुख यांचा श्रीफळ, शाल आणि गुरुदक्षिणा देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण परिवाराचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला.  देशमुख यांचा ७५ वा जन्मदिन याच महिन्यात असल्यामुळे दुग्धशकर्रा योग जुळून आला. अंजली देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला भूषण बागडे, किसन श्रीनगर, श्याम जाजू, संजय कुलकर्णी, भास्कर शेंडे, प्रभाकर मानकर, गजानन कडकडे, अरुण चक्रनारायण, पुरुषोत्तम डिक्कर, शिवा धर्मकर, विठ्ठल देशमुख, चंद्रमणी गायकवाड, सुधीर दंडी, अरुण पिंपळे, सारंधर थोरात, दीपक शिरसाट, सुधाकर देशमुख, प्रमोद अग्निहोत्री, साहेबराव वानखडे, किसन पाटील आदी उपस्थित होते. या सोहळ्याची सांगता देशमुख यांचा नातू हिमांशू याने भैरवी रागाची गुरुवंदना गाऊन केली. कार्यक्रमाचे संचालन श्याम जाजू तर आभार प्रदर्शन दीपक शिरसाट यांनी केले.

error: Content is protected !!