अकोला : बोर्ड ऑफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडियाला सनातन संस्कृती महासंघाचेवतीने निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की, बोर्ड मार्फत जागतिक करंडक, टी- २० तसेच चॅम्पियन ट्राॅफी क्रिकेट सामान्यांचे आयोजन भारतात करण्यात येते अथवा सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यात येते. स्पर्धेत अनेक देशांच्या चमू सहभागी होतात. आपल्या संस्कृतीनुसार आपण पाहुण्यासंघाचे स्वागत करतो. क्रिकेट सामान्यांचे आयोजन देशातील मोठ्या महानगरात करण्यात येते, हजारो- लाखोंच्या संख्येने लोक सामना बघण्यासाठी येतात. सामन्याचे दरम्यान खेळाडूंनी शिष्टाचाराचे पालन करणे अपेक्षित आहे. काही सामान्याचे दरम्यान असे निदर्शनास आले आहे की, खेळाडू मैदानावर प्रार्थना करतात. क्रीडा मैदान हे खेळातील कौशल्य दाखवण्यासाठी आहे, ते धार्मिकस्थळ अथवा प्रार्थनास्थळ नाही. त्यामुळे कुठल्याही देशातील खेळाडूंना अशी परवानगी देण्यात येऊ नये, याचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
भारताच्या क्रिकेट सामन्या दरम्यान काही प्रेक्षक राष्ट्रीय ध्वज खांद्यावर शालीसारखा घेऊन स्टेडियम मध्ये वावरतात. हा राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आहे, हा प्रकार देखील थांबणे आवश्यक आहे. निवेदनात पुढे म्हंटले आहे की, भविष्यात क्रिकेट सामन्याचे दरम्यान किंवा नंतर कुठलाही देशाच्या खेळाडू कडून मैदानावर धार्मिक भावनांचे अतिरेकी प्रदर्शन होणार नाही तसेच राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होऊ नये या दृष्टीकोनातून बोर्ड तर्फे योग्य ती काळजी घेण्यात यावी. महासंघाच्या भावनां बाबत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला देखिल अवगत करावे, असे सनातन संस्कृती महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहीले यांनी कळवले आहे.