Home » राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साजरा केला अकोल्यात विजयादशमी उत्सव 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साजरा केला अकोल्यात विजयादशमी उत्सव 

by Navswaraj
0 comment

अकोला : राष्ट्रभक्तीसाठी स्वार्थाचा त्याग करावा लागेल असे प्रमुख वक्ता विजय देवांगण क्षेत्र सहसंपर्क प्रमुख यांनी अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना सांगितले.

गोरक्षण रोडवरील एकविरा मैदानात रविवारी सायंकाळी अकोला महानगराचा उत्सव संपन्न झाला. मंचावर प्रमुख वक्ता विजय देवांगण, प्रमुख अतिथी पोहरादेवी संस्थानचे महंत बाबुसिंग महाराज, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे तसेच महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल उपस्थित होते.

हिंदू राष्ट्राचे उत्थान करण्याचे संघ अभिन्न अंग आहे. हिंदू राष्ट्राच्या लक्ष्याशी संघाचे लक्ष जुळले आहे. आमचे अधःपतन आमच्या एकात्मते मध्ये कमी आल्यामुळे झाले, असे विजय देवांगण यांनी सांगितले. त्यांनी प्रभू श्री रामचंद्राच्या जीवनावर विस्ताराने प्रकाश टाकला. महंत बाबुसिंग महाराज यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्तविक महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमाला गणवेशधारी स्वयंसेवक व बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!