Home » विजयासह नागपूर विद्यापीठाचा महिला संघ उपांत्यफेरीत

विजयासह नागपूर विद्यापीठाचा महिला संघ उपांत्यफेरीत

by नवस्वराज
0 comment

नागपूर : दमदार खेळाच्या जोरावर आयटीएम विद्यापीठ ग्वाल्हेरच्या यजमानपदाखाली सुरु असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्लोअर बॉल स्पर्धेत महिला गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कर्नाटक विद्यापीठाला सहजच नमवित स्पर्धेत विजयासह उपांत्यफेरीत धडक दिली आहे.

स्पर्धेत नागपूर विद्यापीठ महिला संघाला पहिल्या लढतीत पुढे चाल देण्यात आली होती. तर दुसरी लढत कर्नाटक विद्यापीठासोबत झाली. यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत ६-० अशा गोलने कर्नाटक विद्यापीठाचा धुव्वा उडवित विद्यापीठाच्या महिला संघाने दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. नागपूर संघाकडून ताशी डोलमाने तीन तर रुतिका किन्हेकरने दोन व शर्वरी मुळेने एका गोलचे योगदान देत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. विजयी संघात नेहा चौधरी, रुतिका किन्हेकर, शर्वरी मुळे, ताशी डोलमा, स्पलझिन अंगमो, तोसोमो गानेत डोलकर, क्षितीजा वरडीकर, काजल मोटे, वैष्णवी खानझोडे, मयुरी मेश्राम, प्राची सलाम, निलीमा बाजीराव, डेचेन चुस्कीत आदींचा समावेश आहे. स्पर्धेतील कामगिरीबद्दल नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!