Home » नागपूर शहरात आढळला अत्यंत दुर्मिळ पांढरा साप

नागपूर शहरात आढळला अत्यंत दुर्मिळ पांढरा साप

by नवस्वराज
0 comment

नागपूर : सापांच्या जगामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेला पांढरा अल्बिनो कुकरी साप नागपूर शहरात आढळला आहे. वन्यजीव प्रेमिंनी या सापाला वाचवित निसर्गमुक्त केले आहे.

पूर्णपणे पांढरा असलेला अल्बिनो कुकरी असा दिसतो.

गुरुवार, १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हा पांढरा साप आढळला. बहादुरा मार्गावरील उज्ज्वल नगरात असलेल्या दीपक मते यांच्याकडे हा साप आढळला. वाइल्ड लाइफ सोसायटीचे सदस्य लकी खडोदे यांना याबाबत फोनवर माहिती मिळाली. त्यानंतर वाइल्ड लाइफ सोसायटीचे नितीश भादक्कर, अंकित मरसकोल्हे यांनी बहादुरा परिसर गाठला. तोपर्यंत हा साप एका खड्ड्यात लपला होता. वन्यजीव प्रेमिंना या सापाला सुखरूप बाहेर काढले, त्यावेळी हो अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेल्या पांढरा अब्लिनो कुकरी असल्याचे लक्षात आले. नागपूरसह विदर्भात अत्यंत कमी प्रमाणात या प्रजातीचे साप आढळतात. या सापाला निसर्गमुक्त करण्यात वन्यजीव प्रेमिंना यश आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!