Home » नागपुरातील घरातील बादलीत सापडला डुरक्या घोणस

नागपुरातील घरातील बादलीत सापडला डुरक्या घोणस

by Navswaraj
0 comment

नागपूर : नागपुरातील हिंदुस्थान कॉलनीतील अमन मोहबे यांच्या घरी बादलीत डुरक्या घोणस साप आढळल्याने खळबळ उडाली.

मोहबे यांनी बादलीचे झाकण वरुन लावून ठेवले होते. मानद वन्यजीव रक्षक उधमसिंह यादव यांना मोहबे यांनी फोन करून बादलीत साप असल्याची माहिती दिली. यादव यांनी त्यांच्या घरी जाऊन सुखरूप सुटका केली. साप प्लास्टिक बादलीच्या तळाशी पडलेला होता. अमनने बादली सरळ करून झाकण लाऊन ठेवले होते. खबरदारी घेऊन झाकण काढले. अजगराच्या ठिकाणी व्हायपरच असू शकेल असेच वाटले. पण अजगर वा घोणस, नसुन डुरक्या घोणस होता. डुरक्या घोणस एकदम झडप मारण्यात तरबेज असतो. याच प्रजातीचे रेड सँन्ड बोआ आणि कॉमन सॅन्ड बोवा असे दोन साप असतात. दुतोंड्या माती खाया, डुरक्या घोणस या नावानेही ओळखले जातात. अन्डे न घालता पिलांना जन्म देतात. अतीशय कमी संख्या असल्याने नामशेष होत चालला आहे.

हा साप शक्यतोवर चावत नाहीच आणि हळू पळतो. हार्मलेस, नाॅन व्हेनम्स आहे. याला हाताळले तर महारोग होते असे गैरसमजही आहेत. कोटींमधे याची विक्री परदेशात होते. ह्याच प्रकारच्या सापाची विक्री करतांना उत्तर प्रदेश पोलीसांनी काही उपद्रवी लोकांना ताब्यात घेतले होते. १ कोटी २५ लाखात विक्री किंमत ठरली होती. परदेशात या सापाला घरात पाळले तर समृद्धी येते, मालक धनाढ्य होतो, असा गैरसमज आहे. या मुळे या सापांची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होते. साप बादलीत सुरक्षित होता. त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती. सापाला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला पाठवण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!