Home » भाजपचे डॉ. रणजित पाटीलच विजयी होतील : बावनकुळे

भाजपचे डॉ. रणजित पाटीलच विजयी होतील : बावनकुळे

by Navswaraj
0 comment

नागपूर : अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघातून भाजपचे डॉ. रणजित पाटील हेच विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर विमानतळावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

डॉ. पाटील यांनी गेल्या सरकारच्या काळातही जोमाने काम केले. गृह राज्यमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या असे बावनकुळे म्हणाले. त्यांची कार्यकुशलता पाहुनच त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांचा विजय आधीपेक्षाही अधिक मतांनी होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बुधवार, ११ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थिती डॉ. रणजित पाटील यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे आदी यावेळी उपस्थित होते. अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ येथुन मोठ्या प्रमाणावर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!