Home » अकोल्यात श्री राणी सती दादी प्रकटोत्सव उत्साहात

अकोल्यात श्री राणी सती दादी प्रकटोत्सव उत्साहात

by Navswaraj
0 comment

अकोला : संत श्री गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या श्रीराम मंदिरात नारायणी धाम येथे श्री राणी सती प्रगट उत्सव नवमी पर्वावर साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कलाकार उमा राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाणीत श्री राणी सती दादी गुणगान मंगल पाठ करण्यात आले.

सामूहिक कार्यक्रम, छप्पन भोग दर्शन कार्यक्रम श्री नमो नारायणी, श्रीराम हरिहर संस्था, रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला. सुमन अग्रवाल यांनी ही माहिती दिली. टिळक रोडवरील मोठे राम मंदिरात ८० वर्षांच्या परंपरेनुसार श्री राणी सती दादी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विशेष पूजा-अर्चना करण्यात आली. दुपारी 56 भोग दर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विद्याधर अग्रवाल, विक्रम झुंझुनवाला प्रेम गोयल, बनवारीलाल बजाज, रमेश लड्डा, किसन गोपाल पुरोहित, महेंद्र पुरोहित, सोनल अग्रवाल, ज्योती शर्मा, आरती शर्मा, आशा जोशी, आशा गोयंका, कविता अग्रवाल, गिरीश सिंघानिया, संगिता अग्रवाल, संजय अग्रवाल, चंदा तिवारी, संध्या पाटील, शोभा यादव, हेमंत शर्मा, कल्पेश शर्मा, गिरीश जोशी, अनिल मानधने, गिरीराज तिवारी, सुशील बजाज, रोहित रुंगटा, राम ठाकूर, रोहित तारकरस, कान्हा अग्रवाल, सुशील बजाज, मनोज अग्रवाल, संदीप जोशी, सागर भारुका, संतोष अग्रवाल, विशाल लड्डा, किशोर खंडेलवाल, विजय अग्रवाल, विनायक शांडिल्य, नारायण सोनेरीवाल, संतोष बजाज, अजय जोशी, ओमप्रकाश खत्री, सुनिता जोशी, दीपक शर्मा, धनु आढाव, बबलू नेरे आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!