
डॉ. अंबादास कुलट

डॉ. रामेश्वर भिसे
अकोला : गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोलातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व अमरावती येथील शिवाजी म
हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे.
अकोला निवासी उपजिल्हाधिकारी तथा संत गाडगेबाबा प्रतिष्ठानच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनात स्थापित झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी स्वयंसेवकांद्वारे गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान काम करते. गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अनेक क्षेत्रांत सतत कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. अंबादास कुलट व डॉ. रामेश्वर भिसे हे दोन्ही प्राचार्य केंद्रीय कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतील संचालित नामांकित महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्य पदावर त्यांनी महाविद्यालय विद्यार्थीकेंद्रीत करण्याचे कार्य केले. महाविद्यातील विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. दोन्ही प्राचार्यांच्या अर्थक प्रयत्नांमुळे महाविद्यालयांचे नाव राष्ट्रीयस्तरावर पोहोचले आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित कार्यक्रमात दोन्ही प्राचार्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले, सचिव इशिका चंदनचक्री, कार्यकारिणी सदस्य वैष्णवी आसेकर, दिव्या चव्हाण यांनी सांगितले.