Home » Clean River : राज्यातील 75 नद्या याच माणसामुळे स्वच्छ : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

Clean River : राज्यातील 75 नद्या याच माणसामुळे स्वच्छ : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

by नवस्वराज
0 comment

Chandrapur : एखाद्या गावातील नाला स्वच्छ करायचा म्हटला की प्रशासनाची दमछाक होते. परंतु महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील नव्हे तर तब्बल 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र जसा हिरवागार झाला, तसाच नद्यांचा प्रवाह देखील खळखळणारा होईल, असे गौरवोदगार जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ तथा रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी काढले.

‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम सध्या राबविण्यात येत आहे. नद्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मोहीम या उपक्रमाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबत मुनगंटीवार यांनी आपल्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ 20 दिवसात जलसाक्षरता अभियान राबविले व नद्यांच्या संवर्धनासाठी चार महिन्यात चार शासन निर्णय काढायला लावले असेही डॉ. सिंह म्हणाले. (Rajendra Singh Congratulates Sudhir Mungantiwar for Clean River Movement)

अकोल्यात पुन्हा एकदा मोर्णा नदी स्वच्छता अभियान

चंद्रपुरातील वन अकादमीत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदी’ उपक्रमांतर्गत उमा व इरई नदी संवर्धनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी अजय चरडे, प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, डॉ. प्रवीण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी, राहुल गुळघाणे, अजय काकडे आदी उपस्थित होते.

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातून समोर आलेले जलदूत, जलनायक, जलसेवक, जलप्रेमी आदींची फळी तयार केली. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा आपल्या देशातील नद्या अमृतवाहिनी होत्या. त्या शुध्द, अविरल आणि निर्मळ वाहत होत्या. आपल्या नद्यांमधून अमृत वाहत होते. मात्र आता आपल्या नद्यांची अतिशय दैयनीय अवस्था आहे. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नद्या पूर्ववत अमृतवाहिनी होण्यासाठी मुनगंटीवार यांनी नद्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांत मोठी नदी गंगा स्वच्छ करण्यासाठी ‘नमामी गंगे’ प्रकल्प सुरू केला आहे. तशाच पद्धतीने सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी सरसावले आहेत. पुरातन काळात नद्यांच्या आसपास आपली संस्कृती विकसित झाली. देशातील 99 टक्के नद्यांचा उगम वन जमिनीतून होतो. मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि वन हे दोन्ही महत्त्वाचे विभाग आहेत. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन नद्यांची सद्य:परिस्थती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा करून नदीला शुद्ध, अविरल आणि निर्मळ करावे, असे डॉ. सिंह म्हणाले.

प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि त्यांच्या चमूकडून नदी संवर्धनाचे मोठे कार्य होत आहे. जलसंवधन हे ईश्वरीय कार्य आहे. या पवित्र कार्यात आपणही सहभागी आहोत, याचा मनापासून आनंद आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. ‘मिशन अमृत’ प्रत्येक जिल्ह्यातील एक नदी मॉडेल म्हणून विकसित करण्यात येईल. यात नदीची संपूर्ण माहिती, उगम आणि संगम स्थळावरील माहिती ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होईल, असे नियोजन होणार आहे.

नागपूरच्या नीरी संस्थेमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यावे. नदी संवर्धनासाठी शासन पाठीशी आहे . नदी संवर्धनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करणारे प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर, आमिर खान, आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव व इतर मान्यवरांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. इंटरनेटवर एक पोर्टल तयार करून नद्यांबाबतची संपूर्ण माहिती यात असावी. नद्यांचे संवर्धन, संरक्षण व नियोजनाबाबत लवकरच मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. पर्यावरण, नदी संवर्धन यासाठी राज्य आणि केंद्राच्या कायद्यांचा अभ्यास करून यासाठी समितीची स्थापना केले, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!