Home » महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या १४ विशेष गाड्या सोडणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या १४ विशेष गाड्या सोडणार

by Navswaraj
0 comment

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, 2 स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, 2 स्पेशल गाड्या सोडण्यात येतील.

नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष गाडी 4 डिसेंबर 2022 रोजी 23.55 वाजता सोडली जाईल. 5 डिसेंबर 2022 दुसरी गाडी सकाळी 08.00 वाजता नागपूरहून सुटेल. तिसरी गाडी 5 डिसेंबर 2022 रोजी नागपूरहून 15.50 वाजता सुटेल. अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे गाडीला थांबे असतील.

मुंबईवरून परतीच्या गाड्या 6 डिसेंबरला 16.45 वाजता, 6 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता. 7 डिसेंबरला दुपारी 12 वाजता, 7 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजता, 8 डिसेंबरला 18.35 वाजता सोडण्यात येईल. अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष 7 डिसेंबरला अजनीवरुन 13.30 वाजता सुटेल. वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे या गाडीला थांबा असेल. रेल्वेच्या मोबाईल ॲप (Railway UTS App), तिकीट काऊंटरवरही जनरल तिकीट काढून या गाड्यांमध्ये प्रवास करता येणार आहे.

error: Content is protected !!