Home » चंद्रपुरातील बल्लारशहात रेल्वे वरील फुटओव्हर ब्रिजचा भाग कोसळला

चंद्रपुरातील बल्लारशहात रेल्वे वरील फुटओव्हर ब्रिजचा भाग कोसळला

by Navswaraj
0 comment

चंद्रपूर : बल्लारशहात रेल्वे स्थानकावर असलेला पादचारी फुटओव्हर ब्रिज कोसळल्याने झालेल्या अपघातात 13 तेरा जण जखमी झालेत. यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान हा अपघात घडला.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खाणकावरील फलाट क्रमांक एक आणि दोनला जोडणाऱ्या रेल्वे लाईनवरील फुटओव्हर ब्रिजचा बराचसा भाग अचानक कोसळला. यावेळी रेल्वे लाईनवर असलेले सुमारे 13 जण जखमी झालेत. त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलाचा हा भाग कसा काय कोसळला, याचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!