Home » अकोल्यातील डाबकी रोड रेल्वे फाटक राहणार तीन दिवस बंद

अकोल्यातील डाबकी रोड रेल्वे फाटक राहणार तीन दिवस बंद

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला ते गायगाव मार्गावर असलेले डाबकी रोड रेल्वे फाटक तीन दिवस सहा तास बंद राहणार आहे. या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाला जोडणारा गर्डर या तीन दिवसातील 18 तासात बसविण्यात येणार आहे.

या संदर्भात भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अकोला पोलिस, अकोला रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, गायगाव इंधन डेपो, गायगाव आणि भौरदचे सरपंच, एसटी महामंडळ यांना पत्र लिहून कळविले आहे. 20, 21 आणि 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे रेल्वे फाटक बंद राहिल. भुसावळ रेल्वे अधिकाऱ्यांसह अकोला वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक विलास पाटील यांनी ही माहिती दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!