Home » अकोल्यात भजी तळण्याचा मोह राहुल गांधींना आवरला नाही

अकोल्यात भजी तळण्याचा मोह राहुल गांधींना आवरला नाही

by Navswaraj
0 comment

अकोला : भारत जोडो यात्रेदरम्यान तयार करण्यात येत असलेली खमंग भजी तळण्याचा मोह काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना आवरता आला नाही.  अकोला जिल्हा भारत जोडो पदयात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे होती.

राहुल गांधी आणि काँग्रेस नेतेमंडळी यांच्या दुपारच्या जेवणाच्या मेजवानीचा बेत प्रणिती शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर ते बाळापुर मार्गावरील गजानन रोपवाटिका येथे आयोजीत केला होता. मिर्ची चिरुन चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेली आंध्र भजी, धपाटे, दही, शेंगा चटणी, सोलापुरची खासियत असलेली ज्वारीची आणि बाजरीची भाकरी, गव्हाची हुग्गी यासारखे स्वादिष्ट पदार्थ मेजवानीत होते. यावेळी राहुल गांधी यांनी सर्व पदार्थांची माहिती संबंधीत सोलापुरच्या स्वंयपाक केलेल्या महिलांकडुन घेतली. भजी बनवत असताना बघून राहुलजीना भजी तळण्याचा मोह आवरता आहला नाही. स्वत: त्यांनी काही भजी तळले. खाद्यपदार्थ बनविण्याकरीता यल्लाप्पा तुपदोळकर, शांतकुमार बळगेरी, महानंदा रामपुरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिनी शेट्टीयार, समाधान हाके यांनी विशेष परिश्रम घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!