Home » राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याचे नवे पालकमंत्री

राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याचे नवे पालकमंत्री

by Navswaraj
0 comment

अकोला : राज्य मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांचे पदांमध्ये बुधवारी फेरबदल करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 11 जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाची घोषणा केली. त्यानुसार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आतापर्यंत अकोल्यासह सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती.

राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. जिल्हा निहाय पालकमंत्री पद अशाप्रकारे आहेत. सोलापूर : चंद्रकांत दादा पाटील, अमरावती : चंद्रकांत दादा पाटील, भंडारा : विजयकुमार गावित, बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर : हसन मुश्रीफ, गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम, बीड : धनंजय मुंडे, परभणी : संजय बनसोडे, नंदूरबार : अनिल भा. पाटील, वर्धा : सुधीर मुनगंटीवार.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!