Home » अकोल्यात संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यान

अकोल्यात संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यान

by Navswaraj
0 comment

अकोला : श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, अकोला विभागातर्फे ३० जुलै रविवार, सायंकाळी ५ वाजता, ओम मंगल कार्यालय, सोपीनाथ नगर, बाळापूर रोड, अकोला येथे संभाजी भिडे गुरूजी यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

संभाजी भिडे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अनेक शहरात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मुद्द्यांवर ते तरुणाईशी संवाद साधणार आहेत. अकोल्यात त्यांच्या सभेच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. संभाजी भिडे गुरूजी यांचे जाहीर व्याख्यान ऐकण्यासाठी अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकत्रित येणार आहे. त्याअनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. या जाहीर व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!