Home » ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

by Navswaraj
0 comment

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती.

चिंचवडमधील भाजपा पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता अज्ञात व्यक्तीने थेट त्यांचा तोंडावर शाई फेक केली. चंद्रकांत पाटील हे पडता पडता वाचले. उद्धव ठाकरे शिवसेना गटाने देखील कार्यक्रमाच्या स्थळाच्या जवळच आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!