अकोला : नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा घाट राज्य शासनाने घातला असून हा निर्णय बेरोजगारांवर आणि युवकांवर अन्याय करणारा आहे, असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निदर्शने केली.
खुर्चींना कंत्राटी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी फलके लावून निर्णयाचा निषेध नोंदवला. तसेच हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. राज्यामध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात (मध्यवर्ती बस स्थानक) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या निर्णयाविरोधात निदर्शने केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात महानगर जिल्हाध्यक्ष रफिकभाई सिद्दिकी व प्रदेश उपाध्यक्ष श्याम अवस्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक राष्ट्रवादी आघाडी महानगर अध्यक्ष करण दोड यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले.
आनंद पिंटू वानखडे. महासचिव पंकज गावंडे, परिमल लहाने, अरुण कडू, शेख मेहबूब,शोकात् अली, निसार खान, शामराव वाहुरवाघ, वसीम खान, बाबा घुमरे, पापा चंद्रपवार, अब्दुल जावेद, अक्षय भगेवार, सचिन निंबोकर, मो. मोसिन,अनसार अली, सफिक शाह, शुभम राऊत,प्रद्युम्न लोणकर, ऋषभ पिंजरकर, राज काळे, चिकूगावंडे, हर्षल भोजे, शाम कोहर, अभी मुंडे, सौरभ अग्रवाल, अल्ताफ खान, वैभव भोजपत्रे, सौरभ झाडे, मो. जुनेद, मुकेश तराले, यश साठरोठे, संतोष बुंडे, अनस खान आदी यावेळी उपस्थित होते.