Home » गावागावात यात्रा काढणार‎ ; रविकांत तुपकरांची घोषणा

गावागावात यात्रा काढणार‎ ; रविकांत तुपकरांची घोषणा

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या‎ मागण्यासांठीची लढाई सुरुच‎ राहणार आहे. पुढच्या महिन्यात‎ जिजाऊंचे दर्शन घेऊन आधी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हाभर यात्रा काढणार आणि‎ नंतर राज्यात यात्रा काढणार‎ असल्याची घोषणा शेतकरी नेते‎ रविकांत तुपकर यांनी केली आहे.‎ आपल्याला राजकीय जीवनातून‎ संपवण्याचा कट असून जिवाला धोका असल्याचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आरोपही तुपकर यांनी केला.

सत्ताधाऱ्यांनी पक्षातील काही‎ नेत्यांच्या सांगण्यावरुन आत्मदहन‎ आंदोलन दडपण्यात आले.‎ लाठीचार्ज हा पूर्वनियोजित होता.‎ सरकारने पोलिसांच्या खांद्यावर‎ बंदूक ठेऊन शेतकरी आंदोलन‎ चिरडण्याचा प्रयत्न केला.‎ आमच्यावर हेतुपुरस्सरपणे चुकीचे‎ गुन्हे दाखल केले, अगदी‎ नक्षलवाद्यांसारखी वागणूक देण्यात‎ आली. तुरुंगात टाकले परंतु तरीही‎ आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या‎ मागण्यासांठीची लढाई सुरुच‎ राहणार आहे, असे तुपकर यांनी सांगितले.

अतिवृष्टीची मदत, पिकविमा,‎ सोयाबीन – कापसाला भाव यासह‎ इतर मागण्यांसाठी आम्ही सप्टेंबर‎ महिन्यापासून लढा देत आहोत. ६‎ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार‎ मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी‎ शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत‎ जलसमाधी आंदोलनाची धडक‎ दिली. जलसमाधी आंदोलनामुळे‎ राज्य सरकारने बहुतांश मागण्या‎ मान्य केल्या. त्यानंतर केंद्रीय‎ मंत्र्यांच्या भेटी, पाठपुरावा सुरुच‎ होता परंतु त्याउपरही न्याय मिळत‎ नसल्याने आत्मदहन आंदोलनाचा‎ निर्णय घेतला होता.

या आंदोलनात‎ पोलिसांच्या वेशात नव्हे तर फक्त‎ खाकी कपड्यांमध्ये आलो होतो.‎ अंगावर डिझेल घेतल्यावरही‎ पोलिसांनी ताब्यात घेणे, अटक‎ करणे, दवाखान्यात नेणे यापैकी‎ कोणताच निर्णय न घेता दोन तास‎ उन्हात बसवून ठेवले. एकदा‎ मारहाण झाली, तुरुंगात टाकले की‎ पुन्हा आंदोलन करणार नाही, असा‎ सत्ताधाऱ्यांचा आणि पोलिसांचा‎ समज आहे. परंतु आम्ही थांबणार‎ नाही. सत्ताधाऱ्यांनी आणि‎ पोलिसांनी किती अन्याय केला हे‎ आता जिल्हाभर यात्रा काढून‎ गावागावात सांगणार असल्याची‎ घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!