Home » हिंदू जनजागृती समितीची अकोल्यात निदर्शने

हिंदू जनजागृती समितीची अकोल्यात निदर्शने

by Navswaraj
0 comment

अकोला : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि पुण्यातील बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने अकोल्यात निदर्शने करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराजवळ हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत या दोन्ही प्रकरणाचा निषेध नोंदविला. श्रद्धा वालकर हिच्या मारेकर्‍याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व पुण्यातील बाललैंगिक शोषण प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निदर्शन केल्यानंतर  शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेतली. खडसे यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला निवेदन पाठवण्यात आले, ज्यात दोषींना शिक्षा व्हावी यासाठी खटला योग्य पद्धतीने चालवण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात हिंदू जनजागृती समितीच्या अॅड श्रुती भट, डॉ. अशोक ओळंबे, संजय ठाकूर, गोपाल नागपुरे, श्याम राजंदेकर, गणेश परियाल, संजय धनाडे आदी सहभागी झाले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!