Home » Akola BJP : अकोला भाजपातर्फे प्रियांक खर्गे यांचा निषेध 

Akola BJP : अकोला भाजपातर्फे प्रियांक खर्गे यांचा निषेध 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. याचा निषेध म्हणुन 8 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी अकोलाच्या वतीने भाजप कार्यालय आळशी संकुल येथे निषेध आंदोलन करण्यात आले. ( Protest By Akola BJP Against The Offensive Statement Of Congress Minister Priyank Kharge About Swatantryaveer Savarkar)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रियांक खर्गेच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून व जोडे मारून निषेध व्यक्त केला. बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यापुढे असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रियांक खर्गे यांनी आधी इतिहास वाचावा आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करावी, सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा, सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा आणि भारताच्या स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानाचा अपमान आहे. भविष्यात सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्यास, जनता रस्त्यावर उतरेल आणि बेताल वक्तव्य करणाऱ्याना त्यांची जागा दाखवेल असा इशारा देण्यात आला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, महानगर अध्यक्ष जयंत मसने, कृष्णा शर्मा, विजय अग्रवाल, अर्चना मसने, चंदा शर्मा, राजेंद्र गिरी, युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले, मोर्चा आघाडी सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!