Home » अकोल्यात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन

अकोल्यात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन

by Navswaraj
0 comment

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द काढल्याप्रकरणी शिक्षा झाल्याने भारतीय जनता पार्टी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर भाजपाने अकोल्यात राहुल यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन केले.

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, महानगर भाजपाध्यक्ष विजय अग्रवाल, सिद्धार्थ शर्मा, जयंत मसने, रवी गावंडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या विरोधात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!