Home » Amravati News : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर अडवला

Amravati News : अजित पवारांचा ताफा अमरावती-नागपूर मार्गावर अडवला

by नवस्वराज
0 comment

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी (ता. 9) अमरावती शहरात आयोजित विविध कार्यक्रमांसाठी दौऱ्यावर आले होते. सर्व नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार नागपूरच्या दिशेने सायंकाळी मार्गस्थ झाले. प्रवासात असताना अमरावती शहरापासून सुमारे 40 किलोमीटरवर असलेल्या तिवसा येथे शेतकरी आंदोलक अचानक त्यांच्या गाडी समोर आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवला. तिवसा येथे हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Project affected farmers stopped convoy of dcm Ajit Pawar at Tiosa of Amravati District)

बळीराजा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा या मार्गावरून पुढे जात होता. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा येत असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्यानंतर कुणाला काही कळण्यापूर्वीच मोर्चातील काही आंदोलक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे ठाण मांडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस व सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. ताफा अडविणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला अजित पवार यांच्याशी बोलायचे आहे अशी मागणी रेटून धरली. पोलिसांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लोटण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांची पोलिसांची झटापटही झाली. पोलिसांनी कसाबसा रस्ता मोकळा करून ताफ्याला नागपूरच्या दिशेने रवाना केले. आंदोलन करणारे सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!