Home » प्रा. नरेंद्र वैरागडे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या कार्याध्यक्षपदी

प्रा. नरेंद्र वैरागडे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या कार्याध्यक्षपदी

by Navswaraj
0 comment

नागपूर : साप्ताहिक वृत्तनामाचे संपादक दै. सुपर भारत चे निवासी संपादक दै. केसरी चे ब्युरोचीफ प्रा. नरेंद्र वैरागडे यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नागपूर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल मारेगाव माध्यम क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, प्रदेश महासचिव एड. श्याम खंदारे, विदर्भ विभाग प्रमुख मनोहर शहारे, नागपूर शहर प्रमुख जयंत साठे, नागपूर जिल्हा महासचिव शालिक जिल्हेकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद पाटील, नागपूर शहर सचिव जगदीश राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नरेंद्र वैरागडे हे एक झुंजार पत्रकार असून त्यांनी आपल्या विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित, बहुजन समाजातील उपेक्षित बांधवांना न्याय देण्याचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी बराच काळ बॅचलर ऑफ जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सुद्धा काम केलेले आहे. ते नागपूरातील एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचे  संपादक आहेत. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!