Home » काँग्रेसची लोकसभा जागा वाटपाची पूर्वतयारी सुरू

काँग्रेसची लोकसभा जागा वाटपाची पूर्वतयारी सुरू

by Navswaraj
0 comment

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने येत्या शनिवार पासून मुंबई वगळता राज्यातील अन्य ४२ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागवार बैठकींचे आयोजन केले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चौहान, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आदी प्रमुख नेते या बैठकींना उपस्थित रहाणार आहेत. देशपातळीवर विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी तयार झाली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. आगामी लोकसभा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. याबाबत तीनही पक्षांच्या स्वतंत्र बैठकी होत असून मुंबई मधील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीनंतर जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!