Home » अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण तायडे

अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण तायडे

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला बार असोसिएशनची २०२३-२०२४ ची निवडणूक ९ फेब्रुवारीला पार पडली.अध्यक्षपदासाठी अॅड अर्चना गावंडे, हेमसिंह मोहता, प्रवीण तायडे, उपाध्यक्षासाठी अॅड. प्रविणकुमार होनाळे, मुरलीधर इंगळे, देवीशिश काकड, महिला उपाध्यक्षासाठी अॅड. आम्रपाली गोपनारायण, अरूणा गुल्हाने, कांचन शिंदे तर सचिव पदासाठी अॅड. निखिल देशमुख, सागर जोशी, शिवम शर्मा, महेश शिंदे हे उमेदवार निवडणुक रिंगणात होते.

अध्यक्षपदासाठी अॅड प्रविण तायडे यांनी ५९२ मते मिळवून विजय संपादन केला. उपाध्यक्षासाठी देवीशिश काकड विजयी झाले त्यांना ७६३ मते मिळाली. महिला उपाध्यक्ष म्हणून अरूणा गुल्हाने यांना ५२५ मते मिळाली.  सचिव म्हणून शिवम शर्मा यांची निवड झाली त्यांना ३३९ मते मिळाली.

एकूण १ हजार ४२७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, ४८ मते अवैध ठरली. निवडणुक अधिकारी म्हणून अॅड. यु. पी. नाईक यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक अधिकारी अॅड. रविकांत ठाकरे व जी. डब्ल्यू. पाठक होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!