Home » प्रकाश आंबेडकरांनी घेतला काँग्रेस, राष्ट्रवादीचा समाचार

प्रकाश आंबेडकरांनी घेतला काँग्रेस, राष्ट्रवादीचा समाचार

by Navswaraj
0 comment

अकोला : राजकारणातही आपल्याला आता अस्पृश्यतेची वागणूक मिळत असल्याचा संताप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ट्विटरवरील एका पोस्टच्या माध्यमातून अॅड. आंबेडकर यांनी भाजपासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय राजकारणावर प्रभाव वाढला आहे. तेव्हापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणातही अस्पृश्यता पाळायला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत निमंत्रण द्यायला ती काही सत्यनारायणाची पूजा थोडीच होती, असे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचाही अॅड. आंबेडकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी जर कोणालाही निमंत्रणाची गरज नव्हती तर काँग्रेस ईतर पक्षांना निमंत्रण वाटत का फिरत होती, असा परखड सवालही अॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे, असेही अॅड. आंबेडकर यांनी नमूद केले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!