Home » प्रकृती बिघडल्याने प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

प्रकृती बिघडल्याने प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

by Navswaraj
0 comment

नागपूर : दिवंगत समाजसेवक यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित दीक्षांत सोहळ्यादरम्यान डॉ. आमटे यांची प्रकृती बिघडली. ताप आणि खोकल्याचा त्रास वाढल्याने त्यांना खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांच्या काही चाचण्या सुरू केल्या. डॉक्टरांनी आमटे यांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना फोनवरही न बोलण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यांचे सुपुत्र अनिकेत आमटे यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!