Home » बुलडाण्यात पालकमंत्री बेपत्ताचे लागले पोस्टर्स

बुलडाण्यात पालकमंत्री बेपत्ताचे लागले पोस्टर्स

by नवस्वराज
0 comment

बुलडाणा : अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा कायम असल्यानंतरही बुलडाण्याचे पालकमंत्री जिल्ह्याकडे न फिरकल्याने येथे पालकमंत्री बेपत्ताचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्सपुरतीच ही नाराजी थांबलेली नाही तर पालकमंत्र्यांना शोधणाऱ्याना ५१ रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हे अभिनव आंदोलन सुरू करण्यात आलय.

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले आहेत. गुलाबराव पाटील पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. पाटील यांना शोधून देणाऱ्याला ५१ रुपयांचं बक्षीस असा मजकूर या पोस्टरवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यात केवळ दोनदाच आले असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात आले नाहीत असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी संघटनेच्यावतीने ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. पालकमंत्री बेपत्ता आहेत. त्यांना शोधून देणाऱ्यास ५१ रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असा मजकूर या बॅनरवर आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदारसंघात हे पोष्टर्स लावण्यात आले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!