Home » शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना मिळाली खाती

शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना मिळाली खाती

by नवस्वराज
0 comment

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील .राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत.  राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास. सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय. चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य. डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास. गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण. गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता. दादा भुसे : बंदरे व खनिकर्म. संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन. सुरेश खाडे : कामगार. संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन. उदय सामंत : उद्योग. प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. अब्दुल सत्तार : कृषी. दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा. अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण. शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क. मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार झाल्यानंतर अजून खातीवाटप होईल व मंत्र्यांवर येणारा कामाचा ताण कमी होईल. आगामी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!