Home » अकोल्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

अकोल्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’

by Navswaraj
0 comment

अकोला: पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या अंतर्गत ४० गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. ६० हॉटेल्स, गेस्ट हाऊस तपासण्यासह वाहनचालकांकडून ५६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत मालमत्तेचे गुन्हे व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी अकोला पोलिसां तर्फे  ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ दरम्यान एकूण ३८ गुन्हेगारांचे परिसर तपासण्यात आले. ७२ निगराणीखालील गुन्हेगार तपासण्यात आले. तसेच ११ व्यक्तींवर कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. २० दुकानदारांसह ४० व्यक्तींविरुद्ध कलम ११०/११७, अधिनियम कलम १४२ नुसार दोन गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. आर्म ॲक्टप्रमाणे ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

ऑपरेशनदरम्यान ४२ जामीन वॉरंट व ४३ पकड वॉरंट बजावण्यात आले. एकूण ५२० वाहनांची तपासणी करून त्यापैकी १३४ वाहनांवर कायदेशीर कारवाई करून ५६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार व अंमलदारांनी दोघांकडून शस्त्र जप्त केले. सात निगराणीखालील गुन्हेगार तपासले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!